Diploma विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे? College, Practicals आणि अभ्यास सांभाळण्यासाठी Time Management Tips

१. प्रस्तावना

दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या तुलनेत Diploma मध्ये Unit Tests, Orals, Assignments, Manual Completion आणि Practicals यांचे महत्त्व अधिक जाणवते. प्रवास, घरची कामे आणि College मधील विविध उपक्रम सांभाळताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ कमी पडतो. दहावीपर्यंत Exam च्या दोन महिने अगोदर अभ्यास करून चांगले Marks मिळवता आले असतील; पण Diploma मध्ये त्याच पद्धतीवर अवलंबून राहून चालत नाही. इथे Practical संबंधित कामांसाठीही बराच वेळ द्यावा लागतो. त्यामुळे वेळेचे नियोजन म्हणजेच Time Management करणे गरजेचे आहे.

अगदी छोटे आणि साधे नियम पाळून अभ्यास, विश्रांती व इतर कामांसाठी वेळ कसा काढता येतो, याबद्दल आपण या लेखामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत.

२. तुमचा वेळ नेमका कुठे जातो? (Time Audit)

Notebook च्या एका Page वर आजची तारीख लिहा. त्याखाली तीन Columns बनवा. पहिल्या Column ला Time, दुसऱ्याला केलेले काम आणि तिसऱ्याला Remark असे Title द्या.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अर्ध्या-अर्ध्या तासाचे Time Intervals पहिल्या Column मध्ये लिहा. दुसऱ्या Column मध्ये त्या वेळेत काय केले, ते नोंदवा. तिसऱ्या Column मध्ये प्रत्येक कामासमोर Important किंवा Not Important असा Remark लिहा.

सुरुवातीला दोन ते तीन दिवस असे Time Audit करा. आंघोळ, Fresh होणे, अभ्यास, व्यायाम, प्रवास आणि आवश्यक विश्रांती यांसमोर Important असे लिहा. अनावश्यक Reels, Gaming किंवा विनाकारण मारलेल्या गप्पा यांसमोर Not Important असा Remark द्या.

पुढील दिवसांपासून अनावश्यक गोष्टींवर जाणारा वेळ हळूहळू कमी करा आणि महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक तेवढा वेळ राखून ठेवा. असे केल्यावर आपला वेळ कुठे वाया जातो आणि तो अभ्यासासाठी कसा वापरता येईल, हे तुमच्या लक्षात येईल.

३. दिवसाचे वास्तववादी वेळापत्रक (Realistic Daily Timetable)

दहावीपर्यंत शाळेने दिलेले आणि Diploma ला Admission घेतल्यानंतर College ने दिलेले Timetable आपण Follow करतो. दुसऱ्यांनी दिलेले Timetable पाळण्याची आपल्याला सवय असते; पण स्वतःचे Timetable आपण क्वचितच बनवतो.

सकाळी उठल्यापासून College ला जाईपर्यंत आणि College सुटल्यावर रात्री झोपेपर्यंत उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन केले, तर स्वतःला चांगली शिस्त लागते. यशस्वी होण्यासाठी स्वतःचे नियोजन करून त्यानुसार काम करण्याची सवय उपयोगी पडते. चला, ही सवय विद्यार्थी दशेतच लावून घेऊया.

खिशामध्ये बसेल अशी एक छोटी Pocket Diary विकत घ्या. उद्या काय करायचे आहे, याचे आज रात्री झोपण्यापूर्वी नियोजन करा. सकाळसाठी थोडे Meditation, व्यायाम आणि झालेल्या अभ्यासक्रमाची Revision असे मुद्दे लिहा. संध्याकाळी College सुटल्यावर विश्रांती, Manual किंवा Assignment Completion यांसाठी वेळ ठरवा.

सुरुवातीला Timetable अंगवळणी पडेपर्यंत छोटे Targets ठेवा, जेणेकरून तुमचा Confidence वाढेल. रात्री झोपण्यापूर्वी ठरवलेली कामे झाली का, ते तपासा. पूर्ण झालेल्या कामांसमोर Tick करा आणि उद्याचे नियोजन लिहा. एखादे काम राहिले असेल, तर त्याला पुढील दिवसाच्या नियोजनात जागा द्या. अचानक येणाऱ्या कामांसाठीही Schedule मध्ये थोडा मोकळा वेळ ठेवा.

ज्या दिवशी ठरवलेली सर्व कामे पूर्ण होतील, त्या दिवसाला Star Mark करा. एखाद्या महिन्यामध्ये असे २० Star Days झाले, तर त्या महिन्याला Star Month म्हणून Mark करा. अशा छोट्या गोष्टींमुळे नियोजन पाळण्याचा उत्साह वाढेल.

४. College मधील वेळेचा योग्य वापर (Proper Use of College Time)

College मधील Lectures आणि Practicals मध्ये पूर्ण Attention दिल्यास तो भाग Revise करताना कमी वेळ लागतो. Concepts पुन्हा समजून घेण्यासाठी Extra Classes किंवा YouTube वर अवलंबून राहण्याची गरजही कमी होते. एखादा Concept समजला नसेल, तर लगेच शिक्षकांना विचारा.

Practical चालू असताना Observations, Calculations आणि Results शक्य तेवढे तिथेच पूर्ण करा. त्यामुळे Submission च्या वेळी वेळ वाचेल. एखादा तास Off मिळाल्यास त्या वेळेत Assignment किंवा Manual पूर्ण करा.

Formula Pocket Book किंवा Short Notes सोबत ठेवा. अगदी थोडासा मोकळा वेळ मिळाल्यासही त्यांची Revision करता येते. कधी Mess मध्ये Waiting करावे लागल्यास अशा छोट्या Book मधील Formulas वर नजर टाकता येईल.

५. Manuals आणि Assignments साचू देऊ नका

काही वेळा Practical ला जाताना Manual घरी विसरल्यामुळे त्या दिवशीचे काम Pending राहते. त्यामुळे Practical साठी लागणारे Manual सोबत नेण्याची सवय लावा.

“रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सगळी Manuals आणि Assignments पूर्ण करेन,” असे ठरवून बरेच विद्यार्थी कामे साचवून ठेवतात. त्यामुळे नंतर लेखनाचे काम वाढते आणि अभ्यासासाठी वेळ कमी पडतो. याचा परिणाम Unit Test आणि Final Exam च्या तयारीवर होऊ शकतो.

Submission हे Diploma अभ्यासक्रमातील महत्त्वाचे काम आहे. ते वेळेवर पूर्ण न केल्यास शैक्षणिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे Manuals आणि Assignments वेळच्या वेळी पूर्ण करून तपासून घ्या.

६. कामाचा क्रम ठरवणे (Deciding Work Priorities)

उद्याच्या कामांची List बनवल्यानंतर त्यांचा क्रम ठरवणेही आवश्यक आहे. समजा, तुमच्या List मध्ये Manual Writing, Assignment Completion आणि Unit Test चा अभ्यास अशी कामे आहेत. Unit Test पुढील आठवड्यात असेल, तर तिच्या अभ्यासाला Priority द्या. त्याच वेळी Manual आणि Assignment च्या Submission Dates लक्षात घेऊन त्यांच्यासाठीही वेळ ठेवा.

Unit Test जवळ आली असताना फक्त Writing करत राहिल्यास अभ्यास मागे पडू शकतो. त्यामुळे कामाची तातडी आणि त्याचे महत्त्व पाहून Priority ठरवा.

First Year मधील Mathematics आणि Science यांसारखे जे विषय तुम्हाला अवघड वाटतात, त्यांची नियमित Revision करा. एखादे काम मोठे किंवा अवघड वाटल्यास त्याचे छोटे भाग करा आणि एकेक भाग पूर्ण करा. त्यामुळे Confidence वाढतो. आजचे एखादे काम Pending राहिल्यास उद्याच्या Schedule मध्ये त्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवा.

७. लक्षपूर्वक अभ्यास (Focused Study)

अभ्यासाला बसण्यापूर्वी ३० मिनिटांचा Alarm लावा, Mobile Silent Mode वर ठेवा आणि Notifications बंद करा. या वेळेत काय पूर्ण करायचे, ते आधी ठरवा. लक्षपूर्वक अभ्यास केल्यानंतर छोटासा Break घ्या. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते.

Numericals स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि Formulas न पाहता आठवून लिहा. अभ्यास करताना एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा छोटासा Concept समजला नाही, तर आपण तो YouTube वर पाहण्याचा किंवा AI ला विचारण्याचा विचार करतो. पण दोन मिनिटांसाठी घेतलेला Mobile बाजूला ठेवण्याऐवजी Reels किंवा Games मध्ये अर्धा-पाऊण तास कसा जातो, ते समजतही नाही.

म्हणून एखादी छोटी शंका आली आणि तिच्याशिवाय पुढचा अभ्यास करता येत असेल, तर ती बाजूला लिहून ठेवा. ३० मिनिटांच्या Focused Study नंतर त्या शंकेचे उत्तर शोधा.

काही विद्यार्थ्यांना Headphones लावून गाणी ऐकत अभ्यास करण्याची सवय असते. त्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. अभ्यास करताना गाणी किंवा Videos मुळे लक्ष दुसरीकडे जात असेल, तर ते बंद ठेवून अभ्यास करा.

८. Mobile आणि प्रवासाच्या वेळेचे नियोजन

Social Media वरील Reels किंवा Mobile Games यांमध्ये जास्त वेळ गेल्यास अभ्यासासाठी उपलब्ध वेळ कमी होतो. त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा ठेवा. Educational Videos पाहतानाही अनावश्यक Videos मध्ये वेळ जाणार नाही, याची काळजी घ्या.

रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी Formula Book किंवा Short Notes तयार केल्यास Revision सोपी होते. घरी अभ्यास करताना स्वतःच्या आवाजात महत्त्वाचे मुद्दे Audio स्वरूपात Record केल्यास प्रवासात ते ऐकूनही Revision करता येते. हे उपाय Bus किंवा Train मधून प्रवासी म्हणून जाताना वापरा.

खूप थकवा आला असेल, तर प्रवासातील वेळ विश्रांतीसाठी वापरा. त्यामुळे Fresh वाटेल आणि संध्याकाळच्या अभ्यासात त्याचा फायदा होईल.

९. Weekend Planning

आठवड्यातील काही कामे Pending राहिली असतील, तर ती Weekend ला पूर्ण करा. त्याचबरोबर Family साठी आणि स्वतःच्या छंदांसाठीही वेळ ठेवा. Drawing, Painting, Cycling अशा आवडीच्या गोष्टी करता येतील.

गेल्या आठवड्याचे Timetable एकदा नजरेखालून घाला. ठरवलेल्या कामांपैकी कोणती पूर्ण झाली आणि कोणती राहिली, ते पाहा. अपूर्ण राहिलेल्या कामांमागची कारणे शोधून पुढील आठवड्याच्या नियोजनात सुधारणा करा.

१०. निष्कर्ष (Conclusion)

विद्यार्थी दशेतच Planning करून त्यानुसार सातत्याने काम करण्याची सवय लावल्यास जीवनाला चांगली दिशा मिळते. दररोजचे नियोजन, त्यातील त्रुटी आणि त्यानुसार केलेल्या सुधारणा यांमुळे आपण थोडेथोडे पुढे जात राहतो. या सवयीचा फायदा तुम्हाला अभ्यासात आणि पुढील आयुष्यातही होईल.

तुमच्या पुढील अभ्यासक्रमासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा!

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *