MSBTE K-Scheme First Year मध्ये चांगला स्कोअर कसा करावा? (Super Study Tips)
१. Introduction (प्रस्तावना)
- नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) कडून Diploma विद्यार्थ्यांकरिता 2023-24 पासून नवीन K-Scheme लागू करण्यात आली आहे.
- जुन्या I-Scheme मध्ये Industrial Training सहा आठवड्यांचे होते, मात्र आता K-Scheme मध्ये ते बारा आठवड्यांचे करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाचा चांगला अनुभव मिळतो.
- नोकरीच्या संधी वाढवण्याकरता आधुनिक अभ्यासक्रमाचा (Syllabus) समावेश करण्यात आला आहे, जसे की Python, AI, EV, IoT आणि Machine Learning.
- K-Scheme मध्ये इंग्रजी व मराठीतून परीक्षा देण्याचा पर्याय (Option) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- K-Scheme मध्ये Multiple Entry / Multiple Exit पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे प्रथम किंवा द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर शिक्षण सोडल्यास ते शिक्षण वाया जात नाही.
- First Year मध्ये तुम्हाला Mathematics, Science (Physics & Chemistry) आणि Communication Skills हे विषय असतात. या विषयांचे Concepts clear झाल्यावर पुढील अभ्यासक्रम तुम्हाला सोपा जातो, कारण पुढील वर्षांचा अभ्यास याच विषयांवर आधारित असतो.
- First Year मध्ये तुम्ही चांगला Score केला, तर तुम्हाला Branch Change (शाखा बदलण्याचा) पर्याय पण मिळतो.
- थोडक्यात, K-Scheme First Year मध्ये तुम्हाला चांगला Score कसा मिळू शकतो, याबाबतच्या महत्त्वाच्या Tips वर आपण येथे चर्चा करणार आहोत.
२. Understand the K-Scheme Syllabus (अभ्यासक्रम समजून घ्या)
- K-Scheme मध्ये Unit Tests, Theory Exams, Manual Marks, Practical Exams आणि SLA Marks अशा प्रकारे Evaluation (मूल्यमापन) होते.
-
एकूण 850 Marks चे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
- Unit Tests: 90 Marks (10.6%) Weightage
- Theory Final Exams: 210 Marks (24.7%) Weightage
- Manual Marks: 225 Marks (26.5%) Weightage
- Practical Exams: 175 Marks (20.6%) Weightage
-
SLA Marks (Self Learning Assessment):150 Marks (17.6%) Weightage
- लक्षपूर्वक पाहिल्यावर असे लक्षात येते की, Total Theory Exams ला 300 Marks (35.3%) चे Weightage आहे आणि Practical संबंधी सर्व Activities करिता 550 Marks (64.7%) चे Weightage आहे. यावरून K-Scheme ही खूपच सोपी आणि Practical-Oriented असल्याचे दिसून येते.
-
३. Subject-Wise Strategy (विषयानुसार अभ्यासाची पद्धत)- I. Basic Physics & Basic Chemistry:
- Basic Physics व Basic Chemistry या विषयाची final exam ही MCQ type असल्यामुळे या विषयांचा detail मध्ये अभ्यास करावा लागतो.
- Basic Physics विषयांमध्ये खूप सारे diagrams, formulas, numericals आणि SI units लक्षात ठेवावे लागतात.
- तसेच या विषयांची unit test ही subjective असते, म्हणजे unit test मध्ये definitions, differences आणि numerical examples solving अशा प्रकारचे questions असतात.
- प्रत्येक teacher, unit test च्या अगोदर important questions ची एक question bank देतात, त्यामधील questions परीक्षेत येण्याचे खूप जास्त chances असतात. त्यामुळे unit test ला चांगला score केल्यास चांगले percentage मिळण्याची शक्यता वाढते.
- तसेच unit test च्या वेळेस syllabus कमी असतो, त्यामुळे कमी अभ्यास करूनही चांगले marks मिळतात. Final exam ही multiple-choice असल्यामुळे teachers नी दिलेली MCQ question bank तसेच book च्या पाठीमागे असलेले MCQs solve केल्यास चांगले marks मिळतात. Physics विषयाचे formulas व Chemistry मधील reactions दोन-तीन वेळा लिहून काढल्यास चांगले लक्षात राहतात.
- II. Basic Mathematics:
- Basic Mathematics हा विषय 100 marks साठी असतो, त्यापैकी 30 marks unit tests चे असतात व 70 marks ची final exam असते. Unit test चा syllabus कमी असतो, त्यामुळे तिथे 30 पैकी 30 marks पाडण्याचा प्रयत्न करावा.
- या विषयामध्ये step-by-step solve करण्याकरता marks असल्यामुळे परीक्षेमध्ये answers लिहिताना steps न वगळता पूर्ण steps लिहाव्या.
- Mathematics या विषयाकरता calculator परीक्षेमध्ये allow केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी scientific calculator कसे वापरावे हे अगोदर शिकून घ्यावे, जेणेकरून वेगाने calculations करता येतील.
- MSBTE च्या website वर जुन्या question papers उपलब्ध आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी पाच question papers सोडवल्यास त्याचा खूप मोठा फायदा होतो.
- पाचवी question paper टाईम (Time) लावून सोडवावी, जेणेकरून वेळेत paper पूर्ण होतो हे समजेल. अभ्यास करताना स्वतःचे एक formula book बनवा, ज्याच्यामध्ये फक्त formulas असतील, त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर revision करणे सोपे जाईल.
- III. Communication Skills:
- Communication Skills या विषयाची theory 100 marks साठी असते, त्यापैकी 30 marks unit tests चे असतात व 70 marks हे final exam साठी असतात.
- येथे पण unit test ला कमी syllabus असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी 30 पैकी 30 marks मिळवण्याचा प्रयत्न करावा.
- Final exam मध्ये Active-Passive Voice, Prepositions, Conjunctions, Tenses तसेच Letter Writing, Report Writing, Email Writing या विषयांवर questions विचारले जातात.
- Teachers नी दिलेल्या notes तसेच YouTube videos वापरून grammar चा detail मध्ये अभ्यास करावा.
- तसेच एखाद्या मित्रासोबत रोज थोडा वेळ तरी English मध्ये बोलल्यास grammar मध्ये चांगली सुधारणा होते.
- Letter Writing व Report Writing याचे fix formats असतात, ते दोन-तीन वेळा लिहून काढल्यास चांगले लक्षात राहतात व marks चांगले मिळतात.
- परीक्षेमध्ये प्रभावीपणे answers लिहिण्याकरता चांगली vocabulary असणे आवश्यक आहे, त्यासाठी कमीत कमी रोज दहा English शब्द पाठ करावे.
- एकूण 850 पैकी 225 Marks हे फक्त manual completion साठी राखीव आहेत. तुम्ही college मध्ये regular हजर राहिलात आणि आपले manuals वेळेवर complete करून check करून घेतलेत, तर तुम्हाला 200 ते 225 marks आरामात मिळू शकतात.
- Regular attendance असल्यामुळे तसेच practical batches ला कमी विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थी व teachers मध्ये एक चांगले relation build-up होते, ज्याचा थेट फायदा internal marks मिळवताना होतो. त्यामुळे practical ला regular attendance असणे खूप महत्त्वाचे आहे.
- तसेच Self-Learning Assessment (SLA) करिता 850 पैकी 150 Marks दिलेले आहेत. या अंतर्गत teachers तुम्हाला घरून solve करण्याकरता assignments देतात. त्या वेळच्या वेळी पूर्ण करून सबमिट केल्यास 140 ते 150 marks सहज मिळतात.
- रोज वर्गात शिकवलेला भाग रोजच्या रोज वाचा आणि त्याची नियमितपणे revision करा.
- जे practical आज कॉलेजमध्ये झालेले आहे, त्याचे manual आजच संध्याकाळी किंवा रिकाम्या वेळेत complete करून टाका.
- सकाळी उठल्यापासून college ला जाईपर्यंत, तसेच college मधून आल्यानंतर रात्री झोपेपर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, याचे अर्ध्या-अर्ध्या तासानुसार section-wise नियोजन (Planning) करा.
- आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे mobile आहे, त्यामुळे social media तसेच gaming च्या मोहापासून दूर राहा. तुमचा वेळ खूप precious आहे, तो नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवू नका. Mobile चा उपयोग अतिशय काळजीपूर्वक आणि फक्त अभ्यासासाठी (Study) करा.
४. The Importance of Manuals, Practicals and SLA (मॅन्युअल्सचे महत्त्व)५. अभ्यासाचे वेळेचे नियोजन (Time Management)साधारणपणे सर्व diploma colleges चा time हा सकाळी 10:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत असतो. खूपच busy schedule असल्यामुळे time management करणे खूप महत्त्वाचे आहे. खालील tips वापरल्यास तुमचा खूप सारा वेळ वाचेल आणि अभ्यासही सोपा होईल:६. Conclusion (निष्कर्ष)Diploma च्या प्रथम वर्षात चांगले marks मिळवणे ही काही अवघड गोष्ट नाही, फक्त गरज आहे ती योग्य planning ची आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची. Diploma चे प्रथम वर्ष हा संपूर्ण diploma चा पाया (Base) आहे. इथे जर तुमच्या सर्व concepts clear झाल्या, तर second व third year ला तुम्हाला चांगले marks मिळवून तुमच्या आवडीच्या degree college ला प्रवेश (Admission) मिळवणे खूपच सोपे जाईल.तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील diploma journey करता मनापासून खूप-खूप शुभेच्छा (All the Best)!
- I. Basic Physics & Basic Chemistry:
Leave a Reply