Category: MSBTE Diploma Student Guidance and Tips

  • ११ वी – १२ वी सायन्स पेक्षा डिप्लोमा (Diploma) करून Engineering करणे का सोपे आणि फायदेशीर आहे?

    ११ वी – १२ वी सायन्स पेक्षा
    डिप्लोमा (
    Diploma)
    करून Engineering
    करणे का सोपे आणि फायदेशीर आहे?


    १. Introduction (प्रस्तावना)

    •  शिक्षणातील १० वीचे
      वर्ष
      म्हणजे
      विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा
      Turning
      Point
      असतो. १० वी झाल्यावर पुढे काय करायचे?
      हा विद्यार्थी तसेच पालकांसमोर
      पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात
      Engineering करायचे
      आहे
      , ते बहुतांश वेळा डोळे झाकून 11th Science ला Admission
      घेतात.  बऱ्याच
      पालकांना आणि विद्यार्थ्यांना असे वाटते की
      , फक्त १२ वी Science च्या Marks वर पुढे Engineering ला Admission मिळते. परंतु, Engineering च्या Admission साठी लागणाऱ्या MHT-CET
      IIT-JEE सारख्या स्पर्धा परीक्षांच्या (Entrance Exams) कठीण
      पातळीबद्दल
      (Difficulty Level) त्यांना पूर्वकल्पना नसते. योग्य माहिती
      नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा व पालकांचा
      ११ वी Science ला जाण्याचा निर्णय पुढे जाऊन
      चुकीचा ठरू शकतो.
    • या सर्व मानसिक ताणावर आणि कठीण स्पर्धा
      परीक्षांवर एक उत्तम पर्याय ठरू शकतो
      , तो म्हणजे Polytechnic
      Diploma.
      Diploma क्षेत्रात
      ११ वी–१२ वीच्या तुलनेत कमी स्पर्धा
      (Competition)
      आहे. तसेच, Diploma पूर्ण केल्यावर Engineering च्या थेट द्वितीय वर्षात, म्हणजेच Direct
      Second Year (Lateral Entry)
      मध्ये
      सहज प्रवेश मिळतो.
       १०
      वी नंतर
      कमी
      खर्च आणि कमी स्पर्धा
      असलेला हा Diploma चा मार्ग Engineering करण्यासाठी कसा उत्तम आणि फायदेशीर पर्याय
      ठरू शकतो
      , याबाबतची
      मुद्देसूद चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

    २. थेट इंजिनिअरिंगचा पाया (Core
    Technical Base
    )

    • अकरावी–बारावी Science मध्ये General विषय शिकवले जातात, जसे की Physics,
      Chemistry, Mathematics, Biology.
      हे
      विषय
      Engineering साठी
      आवश्यक आहेत
      , परंतु
      त्यांचा थेट
      Engineering शी
      संबंध नाही. दोन वर्षे
      Students फक्त Theoretical Knowledge, म्हणजेच Theorems, Formulas आणि Numerical Solving यामध्ये घालवतात.  याउलट,
      Diploma मध्ये पहिल्या वर्षापासूनच
      तुम्हाला आवडीची शाखा निवडण्याचा पर्याय असतो
      , जसे की Computer,
      Mechanical, Civil, Electrical, Electronics and Communication
      इत्यादी. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या
      वर्षापासूनच
      Technical Knowledge मिळते.
    • Diploma
      च्या K-Scheme
      नुसार Marking System मधील 65 ते 70% Weightage हे Practical Activities ला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ Hands-on Experience घेण्यामध्ये
      जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली
      Technical
      Skills
      विकसित होतात.
    • Workshop
      Practice
      सारख्या
      विषयांमध्ये मुले स्वतःच्या हाताने काम करून शिकतात.
      Engineering
      Drawing
      या Subject मध्ये मुले Engineering ला लागणारे Drawing Diploma Level लाच शिकून घेतात.  Computer Programming या Subject मध्ये Students C, Java, Python
      सारख्या Languages शिकतात.  Diploma च्या
      विद्यार्थ्यांना
      12 आठवड्यांचे Industrial Training असते. यामध्ये विद्यार्थी स्वतः 12 आठवडे एखाद्या कंपनीमध्ये जाऊन कामाचा अनुभव
      घेतात.
       या सगळ्यांमुळे त्यांचा Engineering चा
      पाया अगदी मजबूत होतो.
    • जेव्हा Diploma चे विद्यार्थी Lateral
      Entry
      द्वारे Engineering
      च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवतात,
      तेव्हा त्यांना त्यांच्या Branch
      चे सर्व Fundamental
      Knowledge
      आधीच
      आलेले असते. त्यामुळे हे विद्यार्थी
      Practical
      Knowledge
      मध्ये
      अकरावी–बारावी करून आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असतात.

    ३. परीक्षेचे दडपण आणि स्पर्धा
    परीक्षांची चिंता (
    No JEE/CET Tension
    )

    • अकरावी–बारावी केल्यानंतर Engineering
      च्या प्रवेशासाठी CET किंवा
      JEE Exam
      द्यावी
      लागते. त्यामध्ये चांगले
      Percentile (90 किंवा त्यापेक्षा जास्त) मिळाले,
      तरच तुम्हाला चांगल्या College
      ला प्रवेश मिळतो. Engineering
      ला Admission घेताना बारावीच्या Percentage ला विशेष महत्त्व नसते. CET तसेच JEE
      या परीक्षा Objective Type तसेच
      Problem-Solving Based
      असल्यामुळे
      बारावीला चांगले
      Percentage मिळालेल्या
      मुलांनाही या परीक्षांमध्ये कमी
      Score मिळाल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला
      पाहायला मिळतात.
    • बारावीची Board Exam ही Theoretical
      Based
      असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना
      Board Exam चा व या Competitive Exams चा
      वेगवेगळा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर

      दुहेरी ताण येतो.  याउलट, Diploma करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या
      वर्षाच्या
      Marks
      वर Engineering
      ला Admission मिळते. त्यांना कोणतीही वेगळी Exam द्यावी लागत नाही. त्यामुळे Engineering
      ला प्रवेश घेणे त्यांना सोपे
      जाते आणि त्यांना वेगळ्या प्रवेश परीक्षेचा मानसिक ताण येत नाही.

    ४. कमी खर्च कमी स्पर्धा (Less Expenses Less compition)

    •  अकरावी–बारावीच्या
      Colleges मध्ये Board Exam ची
      तयारी करून घेतली जाते.
      Board Exam चा
      चांगला निकाल लावणे हे
      Science Colleges चे उद्दिष्ट असते. त्यामुळे Science
      Colleges मध्ये CET
      JEE Exam ची तयारी करून घेतली जात नाही.  त्यामुळे पुढील Engineering च्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवण्याकरता
      विद्यार्थ्यांना बाहेर
      Coaching Classes किंवा Academy Join करावी लागते. अशा Coaching Classes ची Fee दोन लाखांपासून ते आठ लाखांपर्यंत आहे. अशा Classes
      मुळे विद्यार्थ्यांच्या
      पालकांवर
      आर्थिक
      बोजा
      पडतो.
    • याउलट, Diploma च्या तिसऱ्या वर्षाच्या Board Exam च्या Marks वर विद्यार्थ्यांना Engineering ला Admission मिळते. त्यामुळे त्यांना कोणतेही Separate Tuition Classes लावावे लागत नाहीत. त्यामुळे Diploma
      करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
      पालकांवर आर्थिक बोजा पडत नाही.
      तसेच Diploma करणाऱ्या विविध समाजांतील विद्यार्थी व
      विद्यार्थिनींकरता महाराष्ट्र शासनाच्या खूप साऱ्या
      Scholarships
      असतात. तसेच महाराष्ट्र शासनाने
      मुलींकरता
      शिक्षण
      शुल्क माफ
      केल्यामुळे
      मुलींचे अगदी कमी खर्चात
      Diploma चे
      शिक्षण पूर्ण होते.
      विद्यार्थ्यांना Government
      Polytechnic Colleges
      मध्ये Admission
      मिळाल्यास Hostel ची Fee सुद्धा नगण्य असते. त्यामुळे मध्यमवर्गीय
      कुटुंबातील विद्यार्थ्यांना
      Diploma
      Engineering
      हा खूप
      परवडण्यासारखा पर्याय
      आहे.
    • दरवर्षी महाराष्ट्रातून 16 ते 18
      लाख विद्यार्थी CET Exam
      देतात. त्यामुळे CET देऊन Engineering ला जाण्याकरता खूप मोठी स्पर्धा असते. याउलट,
      दरवर्षी 80
      हजार ते एक लाख विद्यार्थी Diploma
      करून बाहेर पडतात. त्यामुळे Diploma
      मार्गे Engineering ला जाण्याकरता खूपच कमी स्पर्धा असते.

    ५. करिअरच्या लवकर आणि दुहेरी संधी (Early
    Job Opportunities
    )

    • १२ वी सायन्स नंतर नोकरीच्या थेट संधी नसतात,
      पुढे डिग्री करणे बंधनकारक
      असते.
      बारावी
      Science झाल्यानंतर
      थेट नोकरीच्या संधी उपलब्ध नसतात. तुम्हाला
      Degree
      करणे बंधनकारक असते. याउलट,
      Diploma पूर्ण
      केल्यानंतर
      तुम्हाला
      विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच तुम्ही
      स्वतःचा
      उद्योग
      सुरू
      करू शकता.
    • Indian
      Railways
      मध्ये
      अनेकदा
      Diploma धारकांसाठी Recruitment निघतात.
      महाराष्ट्र शासनाच्या
      महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि महानगरपालिका या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच
      विद्यार्थी
      Third Year मध्ये असताना विविध कंपन्या Diploma
      Colleges मध्ये येऊन विद्यार्थ्यांची Campus Recruitment करतात.

    ६. वेळेची बचत आणि विषयांची समानता (Time
    Saving & Syllabus Match
    )

    • अकरावी–बारावीची दोन वर्षे Engineering ची चार वर्षे, अशी Degree पूर्ण होईपर्यंत एकूण सहा वर्षे लागतात. Diploma
      केल्यास Diploma ची तीन वर्षे Engineering ला Direct
      Second Year
      ला Admission
      मिळाल्यामुळे त्याची तीन वर्षे,
      अशी एकूण सहा वर्षे लागतात. त्यामुळे Diploma केल्यास कोणताही अतिरिक्त वेळ वाया जात नाही. याउलट,
      Diploma केल्यामुळे विद्यार्थ्यांचा
      आपल्या
      Branch विषयाचा पाया भक्कम झालेला असतो. त्यामुळे त्यांना Direct
      Second Year ला गेल्यावर तेथील अभ्यासक्रम
      सोपा जातो.

    ७. Conclusion (निष्कर्ष)

    •  दहावीनंतर
      ज्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुढे
      Engineering
      करायचे हे ठरलेले आहे,
      त्यांच्यासाठी Diploma हा Science
      पेक्षा कधीही आर्थिकदृष्ट्या
      फायदेशीर व मानसिक ताण कमी करणारा पर्याय आहे.
       विद्यार्थी व पालकांनी
      CET JEE
      च्या Percentile च्या मागे धावण्यापेक्षा Practical Skills वर
      लक्ष दिले
      , तर
      तुम्हालाही
      Diploma हा
      पर्याय योग्य वाटेल.
    • तुम्ही कोणता पर्याय निवडत आहात, ते मला Comment
      मध्ये नक्की कळवा.

    तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून
    शुभेच्छा!


     

     

  • MSBTE K-Scheme First Year मध्ये चांगला स्कोअर कसा करावा? (Super Study Tips)

     MSBTE K-Scheme First Year मध्ये चांगला स्कोअर कसा करावा? (Super Study Tips)

    १. Introduction (प्रस्तावना)
    • नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) कडून Diploma विद्यार्थ्यांकरिता 2023-24 पासून नवीन K-Scheme लागू करण्यात आली आहे.
    • जुन्या I-Scheme मध्ये Industrial Training सहा आठवड्यांचे होते, मात्र आता K-Scheme मध्ये ते बारा आठवड्यांचे करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाचा चांगला अनुभव मिळतो.
    • नोकरीच्या संधी वाढवण्याकरता आधुनिक अभ्यासक्रमाचा (Syllabus) समावेश करण्यात आला आहे, जसे की Python, AI, EV, IoT आणि Machine Learning.
    • K-Scheme मध्ये इंग्रजी व मराठीतून परीक्षा देण्याचा पर्याय (Option) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
    • K-Scheme मध्ये Multiple Entry / Multiple Exit पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे प्रथम किंवा द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर शिक्षण सोडल्यास ते शिक्षण वाया जात नाही.
    • First Year मध्ये तुम्हाला Mathematics, Science (Physics & Chemistry) आणि Communication Skills हे विषय असतात. या विषयांचे Concepts clear झाल्यावर पुढील अभ्यासक्रम तुम्हाला सोपा जातो, कारण पुढील वर्षांचा अभ्यास याच विषयांवर आधारित असतो.
    • First Year मध्ये तुम्ही चांगला Score केला, तर तुम्हाला Branch Change (शाखा बदलण्याचा) पर्याय पण मिळतो.
    • थोडक्यात, K-Scheme First Year मध्ये तुम्हाला चांगला Score कसा मिळू शकतो, याबाबतच्या महत्त्वाच्या Tips वर आपण येथे चर्चा करणार आहोत.
    २. Understand the K-Scheme Syllabus (अभ्यासक्रम समजून घ्या)
    • K-Scheme मध्ये Unit Tests, Theory Exams, Manual Marks, Practical Exams आणि SLA Marks अशा प्रकारे Evaluation (मूल्यमापन) होते.
    • एकूण 850 Marks चे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
      • Unit Tests: 90 Marks (10.6%) Weightage
      • Theory Final Exams: 210 Marks (24.7%) Weightage
      • Manual Marks: 225 Marks (26.5%) Weightage
      • Practical Exams: 175 Marks (20.6%) Weightage
      • SLA Marks (Self Learning Assessment):

        150 Marks (17.6%) Weightage

    • लक्षपूर्वक पाहिल्यावर असे लक्षात येते की, Total Theory Exams ला 300 Marks (35.3%) चे Weightage आहे आणि Practical संबंधी सर्व Activities करिता 550 Marks (64.7%) चे Weightage आहे. यावरून K-Scheme ही खूपच सोपी आणि Practical-Oriented असल्याचे दिसून येते.

    • ३. Subject-Wise Strategy (विषयानुसार अभ्यासाची पद्धत)
      • I. Basic Physics & Basic Chemistry:
        • Basic Physics व Basic Chemistry या विषयाची final exam ही MCQ type असल्यामुळे या विषयांचा detail मध्ये अभ्यास करावा लागतो.
        • Basic Physics विषयांमध्ये खूप सारे diagrams, formulas, numericals आणि SI units लक्षात ठेवावे लागतात.
        • तसेच या विषयांची unit test ही subjective असते, म्हणजे unit test मध्ये definitions, differences आणि numerical examples solving अशा प्रकारचे questions असतात.
        • प्रत्येक teacher, unit test च्या अगोदर important questions ची एक question bank देतात, त्यामधील questions परीक्षेत येण्याचे खूप जास्त chances असतात. त्यामुळे unit test ला चांगला score केल्यास चांगले percentage मिळण्याची शक्यता वाढते.
        • तसेच unit test च्या वेळेस syllabus कमी असतो, त्यामुळे कमी अभ्यास करूनही चांगले marks मिळतात. Final exam ही multiple-choice असल्यामुळे teachers नी दिलेली MCQ question bank तसेच book च्या पाठीमागे असलेले MCQs solve केल्यास चांगले marks मिळतात. Physics विषयाचे formulas व Chemistry मधील reactions दोन-तीन वेळा लिहून काढल्यास चांगले लक्षात राहतात.

      • II. Basic Mathematics:
        • Basic Mathematics हा विषय 100 marks साठी असतो, त्यापैकी 30 marks unit tests चे असतात व 70 marks ची final exam असते. Unit test चा syllabus कमी असतो, त्यामुळे तिथे 30 पैकी 30 marks पाडण्याचा प्रयत्न करावा.
        • या विषयामध्ये step-by-step solve करण्याकरता marks असल्यामुळे परीक्षेमध्ये answers लिहिताना steps न वगळता पूर्ण steps लिहाव्या.
        • Mathematics या विषयाकरता calculator परीक्षेमध्ये allow केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी scientific calculator कसे वापरावे हे अगोदर शिकून घ्यावे, जेणेकरून वेगाने calculations करता येतील.
        • MSBTE च्या website वर जुन्या question papers उपलब्ध आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी पाच question papers सोडवल्यास त्याचा खूप मोठा फायदा होतो.
        • पाचवी question paper टाईम (Time) लावून सोडवावी, जेणेकरून वेळेत paper पूर्ण होतो हे समजेल. अभ्यास करताना स्वतःचे एक formula book बनवा, ज्याच्यामध्ये फक्त formulas असतील, त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर revision करणे सोपे जाईल.
      • III. Communication Skills:
        • Communication Skills या विषयाची theory 100 marks साठी असते, त्यापैकी 30 marks unit tests चे असतात व 70 marks हे final exam साठी असतात.
        • येथे पण unit test ला कमी syllabus असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी 30 पैकी 30 marks मिळवण्याचा प्रयत्न करावा.
        • Final exam मध्ये Active-Passive Voice, Prepositions, Conjunctions, Tenses तसेच Letter Writing, Report Writing, Email Writing या विषयांवर questions विचारले जातात.
        • Teachers नी दिलेल्या notes तसेच YouTube videos वापरून grammar चा detail मध्ये अभ्यास करावा.
        • तसेच एखाद्या मित्रासोबत रोज थोडा वेळ तरी English मध्ये बोलल्यास grammar मध्ये चांगली सुधारणा होते.
        • Letter Writing व Report Writing याचे fix formats असतात, ते दोन-तीन वेळा लिहून काढल्यास चांगले लक्षात राहतात व marks चांगले मिळतात.
        • परीक्षेमध्ये प्रभावीपणे answers लिहिण्याकरता चांगली vocabulary असणे आवश्यक आहे, त्यासाठी कमीत कमी रोज दहा English शब्द पाठ करावे.


      • ४. The Importance of Manuals, Practicals and SLA (मॅन्युअल्सचे महत्त्व)
        • एकूण 850 पैकी 225 Marks हे फक्त manual completion साठी राखीव आहेत. तुम्ही college मध्ये regular हजर राहिलात आणि आपले manuals वेळेवर complete करून check करून घेतलेत, तर तुम्हाला 200 ते 225 marks आरामात मिळू शकतात.
        • Regular attendance असल्यामुळे तसेच practical batches ला कमी विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थी व teachers मध्ये एक चांगले relation build-up होते, ज्याचा थेट फायदा internal marks मिळवताना होतो. त्यामुळे practical ला regular attendance असणे खूप महत्त्वाचे आहे.
        • तसेच Self-Learning Assessment (SLA) करिता 850 पैकी 150 Marks दिलेले आहेत. या अंतर्गत teachers तुम्हाला घरून solve करण्याकरता assignments देतात. त्या वेळच्या वेळी पूर्ण करून सबमिट केल्यास 140 ते 150 marks सहज मिळतात.
        ५. अभ्यासाचे वेळेचे नियोजन (Time Management)
        साधारणपणे सर्व diploma colleges चा time हा सकाळी 10:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत असतो. खूपच busy schedule असल्यामुळे time management करणे खूप महत्त्वाचे आहे. खालील tips वापरल्यास तुमचा खूप सारा वेळ वाचेल आणि अभ्यासही सोपा होईल:
        • रोज वर्गात शिकवलेला भाग रोजच्या रोज वाचा आणि त्याची नियमितपणे revision करा.
        • जे practical आज कॉलेजमध्ये झालेले आहे, त्याचे manual आजच संध्याकाळी किंवा रिकाम्या वेळेत complete करून टाका.
        • सकाळी उठल्यापासून college ला जाईपर्यंत, तसेच college मधून आल्यानंतर रात्री झोपेपर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, याचे अर्ध्या-अर्ध्या तासानुसार section-wise नियोजन (Planning) करा.
        • आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे mobile आहे, त्यामुळे social media तसेच gaming च्या मोहापासून दूर राहा. तुमचा वेळ खूप precious आहे, तो नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवू नका. Mobile चा उपयोग अतिशय काळजीपूर्वक आणि फक्त अभ्यासासाठी (Study) करा.
        ६. Conclusion (निष्कर्ष)
        Diploma च्या प्रथम वर्षात चांगले marks मिळवणे ही काही अवघड गोष्ट नाही, फक्त गरज आहे ती योग्य planning ची आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची. Diploma चे प्रथम वर्ष हा संपूर्ण diploma चा पाया (Base) आहे. इथे जर तुमच्या सर्व concepts clear झाल्या, तर second व third year ला तुम्हाला चांगले marks मिळवून तुमच्या आवडीच्या degree college ला प्रवेश (Admission) मिळवणे खूपच सोपे जाईल.
        तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील diploma journey करता मनापासून खूप-खूप शुभेच्छा (All the Best)!